रामायणात असे सांगितले आहे की, रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले तेव्हा त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती.
१४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामाचे अयोध्येत आगमन झाल्यामुळे प्रत्येक घरात, प्रत्येक गावात दिवे लावले गेले. तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजय मिळवण्याचा सण बनला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला.
ज्या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला त्या दिवशी धनत्रयोदशी साजरी करण्यात येते. कृष्णानं नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरक चतुर्दशी साजरी केली जाते.
घरातील अमंगळ जावं आणि घरातील धन-दौलत समृद्धी कायम राहावी यासाठी लक्ष्मीपूजन केलं जाते. बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता.
त्याला मारण्यात आले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात
“इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो”.
भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता. त्यानंतर तिने त्याला जेवू घालून औक्षण केले आणि त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेली यमराजाने प्रसन्न होऊन बहीण यमुनाला वरदान दिले की, जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती यमराजाला घाबरणार नाही.
याच दिवसापासून भाऊबीजेची सुरुवात झाली त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया देखील म्हटले जाते.

Discussion about this post