समीर बल्की -तालुका प्रतिनिधी
चिमूर :- राजुरा येथील जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण बहुद्देशीय संस्थेचे विजय पचारे ह्या रस्त्यावरून जातांना त्यांना दोन कोल्हे नर -मादी मृतावस्थेत आढळले, नुकत्याच एका वाहनाने ज़ोरदार धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
विजय पचारे यांनी हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे अध्यक्ष दिनेश खाटे यांना घटनेची माहिती दिली, त्यांनी घटनास्थळ गाठत, घटनेची तिव्रता लक्षात घेत, अपघात कशामुळे झाला असेल याचा शोध घेत असतांना, त्यांच्या हे लक्षात आला कि, ह्या मार्गावर कोळसा खाणी असल्याने दिवसभर जड वाहतूक सुरु असते, जवळच असलेल्या कापनगावं बिट, मासरा जंगलात रेती चोरांचे जाळे पसरल्याचे संशय व्यक्त केला, काही दिवसाअगोदर सास्ती कोळसा खदानी जवळ पट्टेरी वाघ आढळल्याचे दिसले, ह्या परिसरात वाघ नेहमीच दिसतो असे, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी सांगितले, आज कोल्ह्याचा मृत्यू झाला, उद्या वाघाचा सुद्धा अपघाती मृत्यूची शक्यता नाकारता येत नाही.
कोल्ह्याचा जोडीदार जीवनभर एकच असतो, विनीच्या हंगामात नर मादिला संरक्षण देतो, विनीचा काल ऑक्टोबर डिसेंबर महिन्यात असतो व गर्भधारणा ६३ दिवसांचा कालावधी घेतात त्याच काळात कोल्ह्याचा अपघातात मृत्यू झाला. वनविभागाने “वाहने हळू चालवा” असे सूचना फलक लावले आहे, पण त्याच सूचना फलका समोरून वेगात गाड्या जातात, सूचना फलकाचा काहीही उपयोग होत नाही.वाघांचे भ्रमणमार्ग सुरक्षित राहावे ह्याच्यासाठी सर्व वन्यजीव प्रेमी वनविभाग प्रयत्न करतांना दिसतात पण जंगलाचा भाग नसलेला, शेतीचा गवताळ भागात असलेल्या भागात कोल्हा ,लांडगा , खोकड, तडस ह्या प्राण्याचा सुद्धा विचार करणे गरजेचे असल्याचे चित्र आपण स्पष्ट बघत आहो, आणि तसे नियमावली आहे सुद्धा पण रस्ते बांधत असतांना ना सार्वजनिक विभाग ना वनविभागानी ह्या प्राण्यांसाठी ऍग्रीकल्चर फील्ड मधून रस्ता जात असला तरी उपशमन योजना राबवत नाही, त्याचे आज गंभीर परिणाम ह्या मुक्या वन्यप्राण्यांवरती पडत आहे, असे असंख्य वन्यप्राणी रस्त्यावरती मरतात, जाणारे येणारे लोक बघून दुर्लक्ष करतात, पण त्यांना हि माहिती वनविभागाला द्यावी किंवा वन्यजीव संस्थांना द्यावी असं त्यांना गरजेचं वाटत नाही पण तोच वाघ , बिबट जर असता तर मात्र गर्दी झाली असती.
आपण समतोल राखण्यात पावलोपावली अपयशी ठरत आहोत, आपण लोकसंख्या वाढत आहे म्हणून विकासाच्या नावावर मोठमोठे रस्ते बनवत आहो पण वन्यप्राण्यांचा विचार हा फक्त जंगल जिथे आहे तिथेच केला जातो, जंगल नसलेल्या ठिकाणच्या वन्यप्राणीच काय? हा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो म्हणून हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी वतीने महामार्ग प्रशासन वनविभाग यांना ऍग्रीकल्चर फील्ड मध्ये सुद्धा उपशमन योजना राबवावी हि विनंती सार्वजनिक बांधकाम विभाग वर वनविभागाला करण्यात आली आहे. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड यांना देण्यात आली, घटनास्थळी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी वतीने अध्यक्ष दिनेश खाटे,चंदन पुणेकर, तुषार कराडे उपस्थित होते.
Discussion about this post