
के.पी. पाटील यांना जयवंतराव शिंपी गटाचा पाठिंबा…
आजरा – तालुका प्रतिनिधी,
महाविकास आघाडीचे राज्यातील नेत्यांच्या बळावर जी आघाडी तयार झाली आहे. व जातीवारी पक्षासोबत न जाता पुरोगामी विचारांच्या आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे आजरा येथील जयवंतराव शिंपी या गटाच्या बैठकीत माजी आमदार व महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार के.पी. पाटील बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक श्री. जयवंतराव शिंपी साहेब यांनी केले.
के. पी. पाटील साहेब म्हणाले मी आता शिवसैनिक म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार आहे माझे चिन्ह मशाल असून ही मशाल आजरा मतदार संघात घरोघरी पोटोच्याची जबाबदारी आपल्या गटाची आहे. जयवंतराव शिंपी हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आयुष्यभर भ्रष्टाचारापासून दूर राहून समाजसेवा केली आहे
आजरा साखर कारखाना बंद पडूनये म्हणून भरपूर प्रयत्न केले हे मोठे योगदान आहे. मागील सर्व गोष्ठी, हेवेदावे विसरून आपण सर्वाना कामाला लागावे असे पाटील यांनी सांगितले जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांनी दिलेल्या सूचना प्रमाणे आपल्या गराचा मानसन्मान राखला जाईल
निवडणूकीन ‘ एक वोट एक नोट ‘ असे मतदारानी आमदार केले. पण आज या मतदारसंघात टक्केवारीचा विकास चालला आहे. हजारो एकर जमिन घेवून मुख्यमंत्री यांच्या जवळचा आमदार म्हणून हवा तितका निधी उपलब्ध झाल्यामुळे टक्केवारी घेऊन आपलीच ठेकेदार आपलेच कॉट्रक्टर असून विकास हा भागाचा नसून ठेकेदारांचा झाला. आदाणीला घेवून वीज तयार करणेचा ठेका दिला आहे. असे के.पी. पाटील आपले मेळाव्यात म्हणाले
अभिषेक शिंपी म्हणाले जिल्हयाचे आमचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन व महाविकास आघाडीचा घटक म्हणून आम्ही के.पी. पाटील साहेबांना पाठींबा देत आहोत त्यांच्या मशाल या चिन्हाला निवडून आणण्यासाठी आजपासूनच प्रचाराला सुरवात करायची आहे. मागील हेवेदावे विसरून एक दिलाने एक मनाने काम करायचे आहे असे आपले मत व्यक्त केले
या मिळाव्यात जाहिर पाठींबा देण्यासाठी अशोक पोवार, किरण कांबळे, सचिन शिंपी, मुकुंद तानवडे विष्णू पाटील, शिवाजी डोंगरे, विक्रम पटेकर, सुधीर जाधव, सुनिल पाटील, के.जी. पटेकर, आसिफ सोनेखान, हुसेन दरवाजकर, वसंत मस्कर, शामराव कांबळे, प्रकाश सरदेसाई, अनिल नार्वेकर, रमेश निकम सदाशिव डेळेकर, पांडूरंग जाधव, यांच्यासह जयवंतराव शिंपी गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास पाटील यांनी आभार मानले.
Discussion about this post