
हा प्रकार आचार संहितेच्या भंगामध्ये मोडत नाही का ?
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
विधानसभा निवडणूकीची निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू झाली आहे मात्र अंबाजोगाई नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण चौकातील दोन मजली व्यापारी संकुलाच्या इमारतीवर बीड जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचा फलक चिन्हा सह उजळ माथ्याने झळकत आहे ही बाब केज विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटली कशी ? सवाल करत हा प्रकार आचारसंहितेच्या भंगामध्ये मोडत नाही का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या कक्षेत अंबाजोगाई शहर येते दरवेळी निवडणूक निर्णय अधिकारी आचार संहितेची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी यासाठी स्वतंत्र पथक नेमतात ते पथक यावर करडी नजर ठेवून कुठे आचारसंहितेचा भंग होत असेल तर संबंधितांना नोटीस देते त्यानंतर कार्यवाही करते केज विधानसभा अंतर्गत आचार संहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी असे पथक नियुक्त केले आहे की नाही माहित नाही अंबाजोगाई, केजचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद नगरपंचायतचे सीओ एवढे अधिकारी असूनही अशा पद्धतीने शासकीय इमारतीवर राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह व नावाचा फलक झळकत असताना एकही अधिकाऱ्याचे लक्ष गेले नाही का ? की डोळेझाक केली जात आहे. असाही सवाल केला जात आहे.
अलीकडे प्रशासनात स्वतःहून कुठलीही भूमिका घेण्याचे सहसा टाळले जाते कोणीतरी तक्रार करावी त्यानंतर प्रशासन चौकशी करणार वाटली तर कार्यवाही नाहीतर फक्त कागद काळे करून जबाबदारी झटकण्याची मानसिकता अलीकडच्या काळामध्ये वाढत चालली आहे आचारसंहिता तंतोतंत अमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना अनेक ठिकाणी उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना प्रशासन मात्र मूक दर्शक बनल्याचे दिसत आहे बघू या प्रशासन पुढील काळात काय भूमिका घेते ते !
Discussion about this post