पोलीस मित्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसुधा नाईक पुणे..

दिवाळी फराळ
आली आली दिवाळी
फराळाची लगबग सुरू झाली
निवांत छान पदार्थ करायचे
सामानाची यादी वाण्याकडे जमा केली…
आले सामान छान घरपोच
पहिले काय करावे याचाविचार केला
करू म्हटलं गोडापासून सुरूवात
मस्त लाडू वळण्याचा बेत झाला…
रवा घेतला मस्त भाजायला
पिठी साखर तयार करून घेतली
सुकामेवा बारीक करून घेतला
सारे एकत्र करून लाडूंची रास लावली….
गोड,खारे शंकरपाळीचे भिजवले
मस्त पीठ झाल्यावर शंकरपाळे लाटले
मंद आचेवर खुसखुशीत तळले
थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवले,…..
अनारश्याचेही पीठ तयार करून घेतले
खसखस घेवून त्यावर गोल थापले
मस्त लालासर कुरकुरीत तळले
सजनाला बाई भारीच ते आवडले….
गोल गोल काटेरी चक चक चकली
चवीला तिखट,दिसायला देखणी
सर्वांच्याचअत्यंत आवडिची आहे
दिवाळ फराळातील ही लावण्यखणी….
करंजीचे पोट गोडसारणानेभरले
अदा करंजीची फारच ह भारी
दिसते देखणी पण कधीही फसवेल
सादळू नये म्हणजे जमलं ह पदार्थ सारी…
वसुधा वैभव नाईक,पुणे..
Discussion about this post