शिरूर अनंतपाळ तालुका: महिलांची भरघोस उपस्थिति
शिरूर अनंतपाळ, वाल्मीक सूर्यवंशी. ‘मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी’ या योजनेतून शिरूर अनंतपाळ तालुक्यातून एकूण 13,220 अर्ज दाखल झाले आहेत. या योजनेची घोषणा झाल्यापासून अंगणवाडी, ग्रामपंचायत, आणि ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रांवर महिलांची गर्दी वाढली.
शासनाने दिलेल्या सवलती
शासनाने या योजनेंतर्गत उत्पन्न रहिवासी पुराव्यासारख्या काही जाचक अटी कमी केल्याने अर्ज भरणे सोपे झाले. अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवकांनी महिलांची जनजागृती केली व ऑफलाईन अर्ज जमा करण्यात आले. यामुळे तालुक्यातून 30 जुलै पर्यंत 13,220 अर्ज दाखल करण्यात आले.
अर्जांची स्थिती
यापैकी 13,023 अर्ज पात्र ठरले असून 594 अर्ज त्रुटीमुळे अपात्र झाले आहेत. त्रुटी असलेल्या अर्जांसाठी ऑनलाइन प्रक्रिया चालू आहे तर तीन अर्ज पूर्णत: अपात्र मानण्यात आले आहेत. शिरूर आनंतपाळ तालुक्यातील सर्व अर्जदार महिलांना आशा आहे की त्यांना मानधनाची राखी पौर्णिमेपूर्वी लाभ मिळेल.
Discussion about this post