सुरगाण्यांचे नगरसेवक विजय धनराज कानडे यांच्या मोठ्या भावाची मुलगी 4 नोव्हेंबर रोजी ठीक बारा वाजता घरात सांगून गेली की मी मैत्रीण भाग्यश्री कडे जात आहे त्या दिवसापासून आजपर्यंत तिचा काही शोध लागत नाही पोलीस यंत्रणा कमी पडत असल्यामुळे शोध लागण्यास वेळ लागत आहे त्यामुळे गावात तर्कवितर्क लावत जात आहेत ..
सर्व शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सर्व बघितल्यानंतर सुद्धा काहीच पुरावा हाती लागत नसल्यामुळे आता अपहरणाचा प्रकार निवडणुकीच्या काळात झाला असेल असे लोक अंदाज बांधत आहेत … यामुळे पोलीस यंत्रणाच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे… विजय कानडे यांचे नातेवाईक त्यांचे मित्रपरिवार सर्वच्या सर्व कामाला लागले आहेत…
तरी पोलिस यंत्रणेने सहकार्य करून लवकरात लवकर अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावावा अशी त्यांच्या परिवाराची मागणी आहे …ही अपहरणाची बाब महिला आयोगाच्या सुद्धा लक्षात आणून दिलेली आहे… आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी लवकरात लवकर कारवाई होइल असे आश्वासन दिले आहे…….
Discussion about this post