- नायगाव, (बा.) आ. राजेश पवार यांच्या प्रचारार्थ उमरी येथे आयोजित सभेसाठी मराठा आंदोलकांचा रोषाची तीव्रता कमी करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करीत देगाव येथील युवक राजेश मोरे यांच्यावर भविष्यातील मराठा गोंधळाचे ठपके ठेवत उमरी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
- प्रॉपर उमरी शहरातील मोंढा मैदान उमरी येथील भाजप उमेदवार राजेश पवार यांच्या जाहीर प्रचार सभेदरम्यान काही अनुचित प्रकार घडणार नाही.
- या अनुषंगाने आयोजीत करण्यात आलेले कार्यक्रम शांततेत पार पाडावेत. जिल्हा दंडाधिकारी नांदेड यांच्या आदशान्वये जिल्हयात जमाव बंदी आदेश लागू आहेत. मोठा जनसमुदाय जमा झाल्यानंतर त्या दरम्यान आपल्या कडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
- याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील. संपूर्ण कार्यक्रम होत असताना आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे तंतोतंत पालन करावे.
- आपल्याकडून किंवा इतर लोकांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरुन प्रचलीत कायद्यान्वये कायदेशिर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याची तंबी नोटीस मध्ये देण्यात आली.
Discussion about this post