
(फोटो)
वडवणी( प्रतिनिधी):- महायुतीचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सौ . मंगलताई सोळंके यांनी आज वडवणी शहरांमध्ये ठिकठिकाणी महिला कॉर्नर बैठका घेतल्या ,यावेळी उपस्थितीत महिला सोबत बोलताना त्या म्हणाल्या की आमदार प्रकाशदादा सोळुंके यांनी कधीच जातीवाद केला नाही,
केला तो फक्त विकासच ,आम्हाला आमचे सासरे ,कै. सुंदर सोळंके साहेबांनी (आप्पां) फक्त विकासच शिकविला आहे, जातीवादी नाही ,वडवणी नगरपंचायत मध्ये दादांनी नगराध्यक्ष म्हणून मराठा समाजाला प्रतिनिधीत्व दिले, उपनगराध्यक्ष पद हे वंजारा समाजाला दिली, नगरपंचायत सभापती पद हे मागासवर्गीयासाठी तर दुसरे सभापती पद हे कोष्टी समाजाला दिली तर स्वीकृत नगरसेवक म्हणून शिंपी समाजाचे गुरुप्रसाद माळवदे यांना दिले,
मग दादा जातीवादी असते तर सर्व घटकाला हा न्याय मिळाला असता का असा प्रश्न त्यांनी महिला सोबत उपस्थित केला, आमचे विरोधात निवडणूक लढणारी सगळे पद हे स्वतःच्या घरातच घेतात, यावेळी नगराध्यक्ष सौ वंदनाताई जगताप सह सर्व नगरसेविका उपस्थित होत्या,
याविषयी अधिक माहिती अशी की, माजलगाव विधानसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रचारार्थ सौ. मंगलताई सोळुके यांनी वडवणीत ठिक -ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या, त्या म्हणाल्या की सोळंके कुटुंबाने कधी जातिवाद केला नाही, केला तो फक्त विकासच आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवतोत व जिंकतोतही, आजही मतदार हा प्रामाणिकच आहे, आम्ही केलेल्या कामाची जाणीव मतदारांना आहे ,कुणी कितीही विरोधीभास निर्माण करायचा प्रयत्न केला तरी मतदार त्यांना दात देत नाही, ही वस्तुस्थिती आहे, महायुती सरकारने महिलांना स्वाभिमानी ने जीवन
जगण्यासाठी बऱ्याच काही योजना राबवले आहेत, महायुती सरकारच्या ऋणातून मुक्त होण्याची आपली ही संधी भेटली आहे त्या संधीचं सोनं करा व महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा ,विरोधक स्वतःच्या स्वार्थासाठी विरोधाभास निर्माण करत आहेत. राजकारण म्हणजे विरोधकांचा व्यवसाय झाला, निवडणुकीत लाख रुपये गुंतवायचे व कोट रुपये उत्पन्न मिळवायचं, आणि हे कधी सोळंके कुटुंबाला जमलेच नाही आणि जमणारही नाही आम्ही राजकारण करतो ते फक्त सर्वसामान्य जनतेला त्याचा हक्क मिळवून
देण्यासाठी लढलेल्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वादाने आमच्याकडे सर्व काही आहे आता दादांना पाचव्यांदा आमदार करण्याकरिता पाहिजे तो फक्त तुमचा आशीर्वाद, अशी त्या म्हणाल्या, वडवणीत झालेल्या कॉर्नर बैठकीला ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळाला..
Discussion about this post