प्रतिनिधी: जयराम बदादे
महाराष्ट्र राज्यातील होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये अनेक उमदेवरांनी वज्रमुठ बांधुन जोरदार प्रचार आणि शक्ती प्रदर्शन करत होतो.अशातच इगतपुरी/त्र्यंबकेश्वर मतदार संघाकडे अनेकांची नजर होती,की या मतदारसंघात आतापर्यंत काॅंग्रेस पक्ष बाजी मारत आला असुन यापुढे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात जाईल.ऐनवळी काॅंग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्याने, आपल्या विकासाच्या आणी प्रामाणिक पणे कामाच्या जोरावर जनतेला विश्वास देत,खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत,आज मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आणि महायुतीच्या कार्यकर्ते यांनी विजय मोठ्या आनंदात साजरा केला.यावेळी जेष्ठ नेते संपत सकाळे,जिल्हा परिषद सदस्य विनायक माळेकर, राष्ट्रवादी तालुका प्रमुख बहिरू मुळाणे, सारिक शेख,शिवसेना पदाधिकारी अशोक लांघे, विष्णू बेंडकोळी, रघुनाथ गांगोडे, अक्षय मोरे, सरपंच मोहन बेंडकोळी, उपसरपंच अखलाख शेख, मुख्तार इस्माईल, नितीन लाखन,मा.सरपंच हिरामण गावीत, सरपंच देवचंद बेंडकोळी,हौशीराम बेंडकोळी, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते..
Discussion about this post