सांगली-लग्न सोहळा आटोपून कोल्हापूरहून सांगलीकडे येताना कारवरील ताबा सुटल्याने कार थेट नदीपात्रात कोसळली. सांगलीमधील अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावरून भरधाव कार नदीपात्रात कोसळून तीनजण ठार झाले आहेत. तर ३ जण गंभीर जखमी आहेत. जखमीमध्ये एका 5 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
रात्री एकच्या सुमारास कोल्हापूर वरून सांगलीकडे येताना हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबीय सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी. अपघातानंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. अपघातामधील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत.
कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटोपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते. त्यावेळी भीषण अपघात झाला. गाडी जयसिंगपूरहून सांगलीकडे येत असताना अंकली पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव असणारी गाडी थेट नदी पात्रात कोसळली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी आहेत. मृतांमध्ये प्रसाद भालचंद्र खेडेकर (40), प्रेरणा प्रसाद खेडेकर (35), वैष्णवी संतोष नार्वेकर (23) यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये साक्षी संतोष नार्वेकर (42), वरद संतोष नार्वेकर (21) आणि समरजित प्रसाद खेडेकर या (5) बालकाचा समावेश आहे. हे सर्व सांगली आकाशवाणी केंद्रामागे असणाऱ्या गंगाधरनगर येथील रहिवाशी आहेत.
Discussion about this post