
चिपळूण :–सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) ता.चिपळूण जि. रत्नागिरी या विद्यालयात संविधान दिन मोठया उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदेश सावंत यांनी भुषविले. प्रथम शालेय परीसरात “घर घर संविधान” अशा घोषणा देत संविधान रॅली काढण्यात आली.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व संविधानाचे पूजन करण्यात आले व २६/११ च्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सामुदायिक संविधान म्हटले गेले व संविधानाची शपथ दिली. विद्यार्थी कु. ओम जगताप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेषभुषा धारण केली होती. शिक्षिका सौ. रश्मी मोरे यांनी संविधानाविषयी अतिशय मोलाची माहिती आपल्या मनोगतातून दिली. विद्यार्थी कु. शौर्य पोटे यांनी उत्तम भाषणे केली. मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांनी मुलभुत अधिकार व कर्तव्ये याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका श्रीम. अर्चना देशमुख यांनी केले आभार शिक्षिका सौ. विनया नटे यांनी मानले..
Discussion about this post