कुरुंदा प्रतिनिधी:- पांडुरंग नरवाडे
अधिक माहिती अशी की आज मि नांदेड येथे जात असताना आसेगाव ते नांदेड दरम्यान काही बांधव कावड यात्रा घेऊन औंढा नागनाथ येथे जात होते. यात खास बात अशी की ह्या बांधवानी मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज दादा जरागे पाटील यांचा फोटो ते गळ्यात घालून जात होते मी त्यांना थांबवून विचारले की आपण कोठून आलात आणी आपण संघर्ष योद्धा मनोज दादा जरागे पाटील यांचा फोटो घेऊन का जात आहात. तर त्यातील मावळा संभाजी भोसले रा. वाघी ता.जि.नांदेड येथून आलो आहोत आणी मनोज दादा जरागे पाटील यांच्या साठी आम्ही गोदावारी नदीचे पाणी घेऊन औंढा नागनाथ येथे महादेवाला मनोज दादा जरागे पाटील यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांनी जो लढा उभा केला आहे त्याना त्यामध्ये यश येवो हि पार्थना करण्यासाठी आम्ही कावड यात्रा घेऊन जात आहोत.
Discussion about this post