सह्याद्रीच्या या स्पर्धेला विद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सावर्डेचा निरज इनामदार तिसरा
चिपळूण :–सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या ६७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक २९नोव्हेंबर रोजी संस्थांतर्गत सह्याद्रि टॅलेंट बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा १४वर्षांखालील मुले व मुली, १७वर्षाखालील मुले व मुली तसेच खुला गटातून महिला व पुरुष कर्मचारी अशा ३ गटांमध्ये घेण्यात आली.तिन्ही गटांमधून एकूण १३६ स्पर्धक प्रवेशित झाले होते.
यामध्ये पाचवी ते सातवी मुले गुटातून निरज इनामदार या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटवला असून महिला खुला कर्मचारी गटातून सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ श्रद्धा सावर्डेकर यांनी सलग तीन फेरीमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करून सह्याद्री शिक्षण संस्थांतर्गत पार पडलेल्या टॅलेंट बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल क्रमांक प्राप्त करून दुहेरी यश पटकाविले आहे. सौ श्रद्धा सावर्डेकर यांनी अतिशय शिस्तबद्ध खेळ करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सदर बुद्धिबळ स्पर्धेचे प्रमुख प्रशिक्षक निलेश साळवी, सावर्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे तसेच सह्याद्रि शिक्षण संस्थेचे मुख्य क्रीडा प्रशिक्षक उदयराज आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक श्रद्धा सावर्डेकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगीसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, संचालक मारुतीराव घाग , मानसिंग शेठ महाडिक, संचालिका श्रीमती आकांक्षा पवार ,सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post