
तुमसर– भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, तुमसरच्या वतीने आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कार्यालय प्रमुख सहाय्यक निबंधक विलास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाला सहकार अधिकारी गिरीश धोटे,सहकार अधिकारी श्रेणी १ राजा चोरघडे,मुख्य लिपिक सुधीर शेंद्रे, सहाय्यक सहकार अधिकारी बी. टी. कोहे, मुलचंद नागपूरे आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे,सुधीर गोमासे,ऍड.रोहित बोंबार्डे विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात डॉ.आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेण्यात आला.त्यांच्या विचारांचा समाजावर झालेला सकारात्मक परिणाम आणि त्यांनी दिलेले न्याय, समता आणि बंधुत्वाचे संदेश यावर चर्चा झाली. उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करून सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्वासाठी काम करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. संविधानाचे महत्त्व आणि डॉ. आंबेडकरांचे योगदान अधोरेखित करणारे विचार उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मांडले.कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली..
Discussion about this post