प्रतिनिधी राजकुमार पांचाळ (9657978196)


बांगलादेशात होत असलेल्या हिंदू वरील अत्याचारा विरोधात भोकर मधील विविध हिंदू संघटनांच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी भव्य मूक मोर्चा काढून तहसीलदार गुंडमवार यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.
सध्या वर्तमान बांगलादेशमध्ये हिंदू- शीख बौद्ध जैन पूर्वीपासून बऱ्याच प्रमाणात राहतात या सर्वांची पुण्यभूमी भारत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, संत गुरु नानकदेव भगवान तथागत बुद्ध, वर्धमान महावीर यांचे विचार घेऊन तिथे प्राचीनपरंपरेनुसार आपले धार्मिक जीवन जगत शांततेने राहतात मात्र या समुदायावर प्रचंड मोठ्या प्रमाणात हल्ले होताना दिसत आहे. त्यांच्या संपत्ती हडप केल्या जात आहेत लहान मुले स्त्रिया तरुण यांचे जीवन धोक्यात आले आहे. जीवाच्या आकांताने भारत देशाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. भारताचे दुर्दैव असे ही बांगलादेशी रोहिंगे घुसखोरी करून करोडो संख्येने भारतात राहतात भारत सरकारने या घुसखोरांना पकडून देशाच्या बाहेर हाकलावे . तसेच बांगला देशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर अन्याय अत्याचार केले जात असून तेथील महिला मुलीवर सुद्धा अत्याचार होतआहेत, बांगलादेशातील हिंदू संकटात असून केंद्र शासनाने हा अत्याचार त्वरित थांबवावा . तेथील अल्पसंख्याक हिंदूंना अभय प्रदान करावे. तसेच भोकर येथील किनवट रोडवर गट क्रमांक 45 मध्ये यादवकालीन शिव मंदिराच्या सभा मंडपा समोरील कलावंतींनचा महाल अज्ञात लोकांनी नष्ट केला असून ते अवशेष पूर्ववत त्या ठिकाणी उभारण्यात यावेत अशा मागणीचेही निवेदन देण्यात आले. यासह अन्य मागण्यासाठी विविध हिंदू संघटनांनी एकत्र येऊन 10 डिसेंबर रोजी श्री बालाजी मंदिर येथून सर्व हिंदू बांधव महिला, पुरुष,युवकांनी किनवट रोड मार्गे तहसील कार्यालया पर्यंत मुक मोर्चा काढला. यावेळी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
या वेळी प्रा. डॉ. व्यंकट माने यांनी प्रास्ताविक केले. बांगलादेशात होत असलेल्या हिंदू वरील अन्याय अत्याचाराविरुद्ध सर्व हिंदू समाज बांधवांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले, तर महंत प्रभाकर बाबा कपाटे याने प्रखर विचार मांडले "बांगला देशात हिंदूवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध तुमचं रक्त सळसळत नाही का, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या देशासाठी हसत हसत फासावर चढले हा आपला इतिहास आहे, आज आपल्या देशात शाळेत जाणारी मुलगी सुद्धा सुरक्षित नाही. त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे. झोपेचे सोंग घेऊ नका. लवकर जागृत व्हा." असे आवाहन त्यांनी केले, मुक्ताई नाथ दीदी यांनी "रात्र वैऱ्याची आहे हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदुंनाच एकत्र येण्याची आज गरज आहे. बांग्लादेशात होणारे हे अत्याचार थांबले पाहिजेत. यासाठी सरकारला ठिकठिकाणी निवेदने देऊन बांग्लादेश अत्याचाराविरोधी पाऊल उचलण्यासाठी भाग पाडले पाहिजे" असे विचार त्यांनी मांडले. पिंपळगाव मठाचे मठाधिपती व्यंकट स्वामी महाराज यांनीही सर्व हिंदूंनी संघटित होण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपिठावर महंत उत्तम बन महाराज, चैतन्य बाबा कांडली आश्रम, रवी गुरु जोशी, चंद्रकांत जोशी, निर्मला ताई जामदरी, विठ्ठल महाराज शनी मंदिर, बापूराव पाटील, सतीश शहाणे आदींची उपस्थिती होती.
बांग्लादेश अत्याचार विरोधी निघणाऱ्या या मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासासाठी हिंदु संघटनांकडून पहिल्याच दिवशी भोकर शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळपासून सर्व दुकाने प्रतिष्ठाने हॉटेल कडकडीत बंद होते दुपारनंतर दुकाने उघडण्यात आली यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
Discussion about this post