आयुष्मान कार्ड साठी शासनाच्या नियमाप्रमाणे रेशनकार्ड हे ऑनलाईन होणे महत्वाचे आहे त्यासाठी पुरवठा शाखेकडून बारा अंकी नंबर ऑनलाईन मिळवावा लागतो. सध्या पुरवठा शाखेकडे या बारा अंकी नंबर साठी शेकडो अर्ज प्राप्त आहेत मात्र गेले कित्तेक महिने ‘सर्व्हर डाऊन’ हे एकच उत्तर या विभागाकडून नागरिकांना ऐकायला मिळत आहे या सर्व्हर डाऊन मुळे हजारो नागरिक आयुष्यमान कार्ड पासून वंचित आहेत. त्याला सरकारने पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कित्तेक कुटुंबाचे धान्य या बारा अंकी नंबर वर अवलंबून आहे. रेशन दुकानांमधून ई पॉज मशीन कित्येक वेळा तांत्रिक कारणास्तव बंद असतात त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे यामुळे दुकानदार हि त्रस्त आहेत. या संदर्भात मिरज तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांची भेट घेतली असता त्यांनी पुरवठा शाखेशी संपर्क केला तर सर्व्हर डाऊन असल्याने सध्या कामकाज ठप्प असल्याचे निष्पन्न झाले आणि कधी सुरु होईल याचेही ठोस उत्तर या विभागाकडे नाही. मात्र नागरिकांचे या सर्वर डाऊन मुळे हाल होत आहेत लवकरात लवकर हि यंत्रणा कार्यान्वित व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Discussion about this post