
🔷 गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी पियूष गोंगले 🔷
📲9423170716
शहीद बिरसा मुंडा महाविद्यालय लगाम येथील बिएससी फायनल मधील विद्यार्थी विकास विठ्ठल मडावी यांची गोंडवाना विद्यापीठ फुटबॉल मुलांच्या संघांत निवड करण्यात आली.
दि,16 ते 22 डिसेंबर 2024 या दरम्यान पारूळ विद्यापीठ वरोरा, गुजरात येथे होणाऱ्या बेस्ट झोम फुटबॉल स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या संघांचा प्रतिनिधित्व करणार असून महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या प्रांगणात तो नियमित फुटबॉल या खेळाचा सराव करीत असतो.
त्याचबरोबर विवेक गोंगले व यश म्हशाखेत्री यांची सुध्दा निवड करण्यात आली. वरील फुटबॉल खेळाडू विद्यार्थ्यांना वन विभाग निवृत्त अधिकारी श्री माननीय विठ्ठल मडावी, श्री माननीय सुशील अवरमोल व डॉ शाम कोरडे सरांचे मार्गदर्शन लाभले आहे.
वरील फुटबॉल खेळाडू 14 डिसेंबर रोजी गुजरात करीता रवाना होणार आहे.
निवड झालेल्या फुटबॉल खेळाडूंचे आष्टी तालुका परीसरात सर्वत्र कौतुक होत आहे..
Discussion about this post