
✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली हा तालुका दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो.या भागातील शिक्षण व्यवस्था मागासले आहे, असे समजलें जाते. पण् याचं तालुक्यातील मागील वर्षी एका शिक्षकाला राष्ट्रीय पातळीवर शिक्षण पुरस्कार व एका शिक्षकाला राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. यावरून गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात शिक्षण व्यवस्था मजबूत झाल्याचे सिद्ध होताना दिसून येते.
याच दरम्यान एटापल्ली तालुक्यात येत असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा व कस्तूरबा गांधी विद्यालय एटापल्ली या शाळेला संजय डोरलीकर उपसंचालक महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांनी भेट दिली.
शाळेत सुरू असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली व विद्यार्थ्यांची गुणवत्ता थेट तपासून बघीतले. इयत्ता 1 ली वर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून अधिकार्यांची आश्चर्य व्यक्त केले. या दोन्ही शालेय प्रशासन, वर्ग अध्यापन व्यवस्था, शालेय सुक्ष्म नियोजन , स्वच्छता, शालेय परिसर, शालेय गुणवत्ता, शिक्षकांचे कर्तव्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भेटीच्या वेळी सोबत नाकडे उपशिक्षणाधिकारी हर्षीके बुरडकर, गटशिक्षणाधिकारी भरडकर अभियंता श्री निखिल कुमरे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक कुमार कोवे, गट समन्वयक पिल्ले,अभियंता किशोर खोब्रागडे, साधनं व्यक्ती एम.डी.बेडके, मुख्याध्यापक, शिंपी मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते..
Discussion about this post