झरी (ता ) : –
2023 – 24 चा रब्बी व 2024 -25 चा खरीप पिक विमा मिळण्याबाबत काँग्रेस कमिटी झरी कढून तहसीलदार झरी यांना निवेदन देण्यात आले . यावेळी संदीप बुर्रेवार माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी तसेच सुभाष कुडमेथे सरपंच दाभाडी ,नितीन खडसे ,राकेश गालेवार ,संतोष कोहळे ,व्यंकटेश कोडापे ,सुनील कुमरे यांनी दिलेआहे .2023- 24 चा खरीप पिक विमा 555 शेतकऱ्यांनी काढला व तक्रारी 529 लोकांनी केले . सर्वे मध्ये 286 लोकांना पात्र केले व 228 लोकांनी चुकीचे इंटिवेशन होते म्हणून त्यांना अपात्र केले , लेट इन्टिमेशन पंधरा शेतकरी व फक्त पिक विमा 26 लोकांना मिळाला आहे तरी शेतकरी अपात्र कसे झाले याची चौकशी व्हावी . आज जर आमच्या काही शेतकऱ्यांचे ऑनलाइन चौकशी केली असता अप्रूड म्हणून स्टेटस दिसत आहे .तक्रार करून काही शेतकऱ्यांना शेतात विमा कंपनीचा प्रतिनिधी गेला का याची सुद्धा चौकशी व्हावी .ऑनलाइन चेक करून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा व 2024 -25 चा हंगाम रब्बी संपत आहे तरी अजून पर्यंत तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही . आमच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले ‘सर्वे झाले तरी पण विमा मिळत नाही ! आपण पिक विमा तक्रार कमिटीचे अध्यक्ष आहात तरी आपण आमच्या तक्रारीची दखल घेऊन या संबंधित विभागाची मीटिंग घेऊन आमच्या तक्रारदार लोकांना बोलावून आमच्या समस्या निकाली काढावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागेल असे संदीप बुर्रेवार माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, सुभाष कुडमेथे सरपंच दाभाडी, नितीन खडसे ,राकेश गालेवार,संतोष कोहळे, व्यंकटेश कोडापे,सुनील कुमरे यांनी तहसीलदाराकडे दिलेल्या निवेदनातून मागणी केलेली आहे .आणि या तक्रारीची प्रतिलिपी खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि आमदार संजयजी देरकर यांच्याकडे देण्यात आले.
Discussion about this post