मारेगाव । तालुक्यातील रस्त्याची अक्षरशः चाळण
महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका म्हणून मारेगाव या तालुक्याची ओळख आहे. तालुक्याच्या निर्मितीपासून तर आजपर्यंत पाहिजे तसा विकास न झाल्याने तालुका हा समस्यांनी ग्रस्त आहे. ‘गाव तिथे रस्ता’ ही शासनाची जरी भूमिका असली तरी बऱ्याच गावाला अजूनही रस्त्याची कमतरता आहे. मागील एक महिन्यापासून संततधार पावसामुळे बऱ्याच रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून, या खड्ड्यातून मार्ग कसा काढावा, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
झाली आहे. करणवाडी नवरगाव हिवरी गोधनी रस्त्यावर दगड गिट्टी निघाल्याने रस्त्यावर दगडांच्या खर्च पडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जाणे येणे कठीण झाले आहे. नवरगाव या विभागाला जोडणारे असंख्य गावे ही आदिवासी बहुल गावे असून त्या गावातील विद्यार्थी शेतकरी तसेच अनेक नागरिक नेहमीच त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागतात. परंतू या भयावह रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. कधी दुचाकी पंक्चर होऊन धक्का मारत न्यावी लागेल याचा नेम नाही. या मार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून डागडुजी नसल्याने रस्त्याची संपूर्ण वाट लागली आहे. मारेगाव वरून हे संपूर्ण क्षेत्र वीस ते तीस किलोमीटर आहे. या गंभीर बाबीकडे आजपर्यंत कोणत्याही पुढाऱ्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. रस्ता व्हावा हे सर्वांना वाटते. परंतु प्रयत्न कोणीच करताना दिसत नसल्याने नवरगाव येथील ग्रामवासी यांनी करणवाडी नवरगाव ते घोंसा पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात यावे, आमदार कडे निवेदन दिलेले आहे यासाठी आता हा मार्ग कधी निर्माण केल्या जाते, याकडे ग्रामावासियांचे लक्ष लागले आहे.
Discussion about this post