
जिंदाल कंपनीतील प्रकरणाचा तपास
आणि चौकशी करु : प्रांताधिकारी
रत्नागिरी :-
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील प्लांटची स्वच्छता करताना त्यातील बाहेर पडलेल्या वाफेमुळे नांदिवडे येथील एका शाळेतील ६० ते ७० मुलांना उलटी, मळमळ, डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणाचा तपास आणि चौकशी करू, अशी माहिती प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी दिली आहे. मात्र असे प्रदुषकारी प्रकल्प त्वरीत बंद करावे अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील असे सुर ग्रामस्थान मधून येत आहेत. तसे निवेदन लवकर जिल्हा अधिकारी यांना देण्यात येईल. असेही माहीती अधिकारी कार्यकर्ता महासंघाच्या वतीने बोलले जात आहे..
प्रतिनिधी – रत्नागिरी नंदकुमार बेंद्रे 08390299992
Discussion about this post