महाराष्ट्रात प्रचलित विविध भक्तिप्रधान गायनशैलींमध्ये कीर्तन परंपरेला अत्यंत मानाचेस्थान आहे.महाराष्ट्राला कीर्तनाची अत्यंत समृध्द परंपरा लाभली आहे. ही परंपरा पूर्णपणे सांगितिक आहे. ज्यावेळी ईश्वराचा नामघोष, जयजयकार आणि आराधना संगीताच्या माध्यमातून केली जाते. त्यावेळी त्याला नामसंकीर्तन असे म्हणतात आणि ज्यावेळी ही भक्ति केवळ गद्यरूपात शब्दांद्वारे व्यक्त केली जाते, त्यावेळी त्याला कथा असे संबोधिले जाते. अर्थात, साहित्य, वक्तृत्व, अभिनय, भाषा, आणि संगीताचा समावेश ज्यात आहे ते कीर्तन होय. कीर्तनात कीर्तनकार आपल्या इष्टदेवतेच्या सगुण रूपाचे वर्णन संगीताच्या माध्यमातून करतो‐ नवविध भक्तीतील कीर्तन हा दुसरा भक्तिप्रकार आहे.
कीर्तनाचे अंतिम ध्येय परमार्थ असले तरी कीर्तनकार आपल्या कीर्तनात माणसाला दैनंदिन जीवनात येणारया प्रापंचिक समस्यांवरही भाष्य करतो. कीर्तनाच्या माध्यमातून तो वेगवेगळया सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतो आणि व्यवहारचातुर्य आणि नैतिक आचरणावर प्रबोधनही करतो. पुराण आणि इतिहासातील आदर्शांचे उदात्तीकरण करून मानवी जीवनातील त्यांचे महत्व विषद करतो. अशाप्रकारे कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सतत समाजप्रबोधन करीत असतो.
शिवतेज पतसंस्था माजी संस्थापक चेअरमन व शिवतेज शाळेचे विद्यमान अध्यक्ष मा.संजय दिक्षित यांनी ह. भ. प. कै. बाबा महाराज सातारकर यांचे नातू ह. भ. प. चिन्मय महाराज व त्यांची कन्या ह. भ. प. भगवती महाराज यांचे कीर्तन दिनांक 7 व 8 डिसेंबर रोजी आळते येथे आयोजित केला होता. कीर्तन महोत्सव मोठा उत्साहात पार पाडण्यासाठी अत्यंत सुंदर निटनेटके नियोजन केले होते.
संपूर्ण आळते पंचक्रोशीतील भक्तीमार्गातील लोकांना कीर्तनाने मंत्रमुग्ध करण्यासाठी व संपूर्ण परिसर भक्ती मार्गात अक्षरशः न्हाऊन निघावे यासाठी आळते गावचे माजी सरपंच सन्माननीय संजू दीक्षित यांच्या या सामाजिक कार्याला खूप यश आले यासाठी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे लोकांनी मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार सुजित मिणचेकर तसेच शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मा.संजय चौगुले यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच या कार्यक्रमासाठी शिवतेज परिवाराचे सर्व सदस्य, पतसंस्थेचे व शाळेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post