
केज नांदुर घाट प्रतिनिधी..
केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या केल्याचा निषेधार्थ तसेच मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई होणे बाबत आज शुक्रवारी दिनांक 13 /12/ 2024 रोजी बीड जिल्हा बंदची हाक सदर मराठा आंदोलक व सरपंच उपसरपंच संघटना महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात आली आहे. तरी याबाबत सर्व प्रकारचे व्यापारी सुजाण नागरिक ग्रामस्थ बांधव सहकारी यांनी झालेल्या निषेधार्थ एक दिवस बीड जिल्हा बंद करून स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध कायदेशीर न्याय मिळणे बाबत व आरोपींना कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी यासाठी नांदूर घाट 100% कडकडीत बंद ठेवून 18 पगड समाजाने निषेध नोंदवला. तसेच तपास सत्य होऊन न्याय मिळावा व पुढे अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी अठरापगड समाजाच्या वतीने नांदूर घाट कडकडीत बंद ठेवण्यात आले..
Discussion about this post