
विविध जाती धर्मांना एका छताखाली एक समान व १८ पगड जाती आणि १२ बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना निर्मिती केली असे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,🚩 आपला देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो, त्याच प्रमाणे आपली राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी घटना म्हणून प्रसिद्ध 🇮🇳🖊️📖 आहे. हीच घटना निर्माण करणाऱ्या ज्ञानाचे प्रतीक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून आपले जीवन पणाला लावलं अस्पृश्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा उद्देश त्यांनी दिला, मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय आहे असे देशाला नारा दिला. न्याय, बंधुत्व, समानता, एकता, प्रेम, शिक्षण, कायदा, सुव्यवस्था, एक संघ, संघटित, अशी चळवळ पूर्ण केली अनेक कोटी कोटी लोकांचा उद्धार केला, त्याच बाबासाहेबांच्या रचलेल्या आणि आपल्याला त्यामध्ये हक्क दिलेल्या संविधानाची विटंबना परवा परभणीत झालेल्या एका अपराधी-देशद्रोही-नराधम माथे फिरूने बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळील असलेल्या “संविधानाच्या” प्रतिकृतीची विटंबना केली असून त्याचे पडसाद व तीव्र भावना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उमटत आहेत जो बाबासाहेबांनी रचलेल्या घटनेला फाडून विटंबना करतो, त्याचा आम्ही इचलकरंजी इथे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णावृत्ती पुतळ्या समोर सर्व बहुजन समाजाच्या संघटनेंना एकत्रित येऊन संविधान बचाव कृती समितीच्या वतीने 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴 तीव्र तीव्र जाहीर निषेध केला.
त्यावेळेस, आम्ही प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय व शिव-लहुजी-फुले-शाहू-आंबेडकर-अण्णा, यांच्या विचारांचा, नावाचा नारा देत संविधानाचे प्रत आणि भारतीय झेंडा फडकवून निदर्शने व रोडवर बसून आक्रोशाने घोषणाबाजी केली, तसेच लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने आता तरी जागे व्हावं समाजाने आता तरी जाग व्हावं, युवकांनी महापुरुषांचे विचारांची चळवळ हाती घ्यावी…
तसेच संविधान बचाव कृती समिती ही दिनांक रविवारी 11/12/2024 रोजी स्थापना केली यासाठी की हिटलरगिरी हुकूमशाही जाती-धर्माचे झेंडे आणि जाती-जातीत भांडणे लावून तेज निर्माण करणे, लोकांमध्ये अहंकाराची छबी निर्माण करण्याची भूमिका काही लोक व हे महायुतीचे सरकार करत आहेत..
आणि आज हे आम्हाला परभणी ची घटना पाहून पहायला मिळालं की खरंच आम्ही संविधान बचाव स्थापनेची घेतलेली भूमिका ✊✊ एक महापुरुषांच्या विचारांची आणि संविधान वाचवण्याची लोकांना जागा करण्याची चळवळ ती या वेळेनुसार खरी ठरली आणि म्हणूनच आता.. आवाज उठवणे आणि लोकांना जागे करणे, हे आमचे ह्या माध्यमातून सर्वांना एकत्रितपणे घेऊन चालू राहील ही अभिवचने व असे प्रतिपादन इचलकरंजीचे लाडके मा.नगरसेवक अब्राहम किसनराव आवळे बापू यांनी केले…
शेवटी संविधान प्रत वाचन करून, महापुरुषांच्या विचारांची नावांची घोषणा देत आंदोलनाची सांगता करण्यात आली.
यावेळी उपस्थित संविधान बचाव कृती समितीचे कार्यवाहक मा.दस्तगीर बागवान, मा.वसीम कलावंत, आर.पी.आय चे मा.खंडू कुरणे, मा.राहुल नगरकर, भीमशक्तीचे मा.बाळकृष्ण हत्तीकर, लहुजी संघटनेचे मा.स्टिफन रामदासजी आवळे, गंगाधर बंडीगने, दलित महिला आघाडीच्या संगीता चव्हाण (ताई), सुरेखा काटकर, नूर जहा घुणके, अरुणा जाधव, गंगाराम घंटीमणी, लियाकत पठाण, मुबारक शेख, मोहम्मद अली मुजावर, रोशन मोहम्मद मुजावर, बाबासो शिंगे आधी प्रमुख कार्यकर्ते व पोलीस प्रशासन बंदोबस्तसहित उपस्थित होते..
Discussion about this post