सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नवीन असे काहीच नाही त्यातच नुकत्याच तब्बल १२०० स्वच्छता कर्मचारी आणि २३ निरीक्षकांच्या बदल्या केल्या गेल्या शहरांमधील स्वच्छता यंत्रणा सुधारावी हा स्वच्छ हेतू यामध्ये प्रशासनाचा होता मात्र आरोग्य विभागाने या बदल्यांमध्येही घोळ कायम ठेवत चक्क दोन मृत कर्मचाऱ्यांच्याच बदल्या केल्याचे निष्पन्न झाले आणि महापालिकेचा अजब कारभार परत एकदा चव्हाट्यावर आला. याबाबत अधिक माहिती देताना शिवराज्य सफाई कामगार संघटनेचे मिरज शहर अध्यक्ष प्रकाश ढंग यांनी सांगितले कि मिरजेतील २३५ स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये बदल्या झाल्या यामध्ये दोन मृत कमर्चारी असल्याचे निदर्शनास आले. या दोघांच्या बदल्या वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकांच्या सहीने केल्या गेल्या आहेत. यातील मृत पंकजा होळकर कायम कर्मचारी होत्या. त्या एक वर्षांपूर्वी मयत झाल्या. यांची नव्याने कुपवाड येथे बदली केली गेली आहे तर मिरजेतील नंदकुमार लोंढे हे चार महिन्यांपूर्वी मयत झाले आहेतयांचीही बदली आताच्या लिस्ट मध्ये आहे. याबाबत अध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले कि या बदल्या चुकीच्या पद्धतीने झाल्या आहेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही आरोग्य विभाग निद्रस्त अवस्थेत काम करत आहे. असे चुकीचे बदली आदेश देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा महापालिकेसमोर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
Discussion about this post