
सध्याच्या युगामध्ये बेकरी कॅफे झाल्यापासून रस्त्यावर सायकलवर खारी टोच विकणारे आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. काही ठिकाणी तर पाहायला सुद्धा भेटत नाही पण बारामती मध्ये 1980 पासून ते आजपर्यंत 44 वर्ष सायकलवर श्री राहुल भोसले ही व्यक्ती आज सुद्धा सायकलवर खारी टोस्ट विकतात गेली 44 वर्षापासून त्यांचा सुरू झालेला प्रवास आज सुद्धा चालू आहे. बारामती गेल्यावर कसबा बुरुड गल्ली खाटीक गल्ली आमराई या परिसरात सकाळी त्यांची सायकलवारी आपल्याला पाहण्यास मिळते. वयाच्या 16 व्या वर्षापासून बारामती मध्ये हा व्यवसाय करतात. हसतमुख चेहरा बोलका स्वभाव त्यांचा मार्केटिंग चा फंडा १६ रुपये किलो ते 240रु किलो असा हा त्यांचा 44 वर्षाचा प्रवास याच व्यवसायातून त्यांनी मुलाला इंजिनियर केले. व मुलगी बँकेची परीक्षा देत आहे. गल्लो गल्ली बेकरी असताना आज देखील त्याच उमदीने काम करत आहे. याचे कौतुक यातून एक समजते समाधान हेच खरे परिस आहे. व ते ज्याला स्पर्श करते तो सुखी !
Discussion about this post