शेतकरी आणि लघुउद्योजकांना जिल्ह्यामध्ये त्यांच्या उत्पादनांना निर्यातीची संधी केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. केन्द्र आणि राज्य सरकार लुघू उद्योजक आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला परदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देईल त्यासाठी शेतकरी आणि उद्योजकांनी निर्यातीसाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले. यावेळी औद्योगिक वसाहतीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, उद्योग भवन च्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी लीना खरात उपस्थित होत्या. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जिल्ह्यातील उद्योजकांना त्यांच्या उत्पादनासाठी निर्यातिला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन केले होते. शैलेश राजपूत म्हणाले कि हा जिल्हा निर्यातक्षम करण्याच्या हेतूने प्रत्यत्न सुरु आहेत. या जिल्ह्यातील निर्यातक्षम संभाव्य उत्पादने आणि सेवा यांची माहिती घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. विशेष करून शेतकरी आणि लघु उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सक्षम करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने त्यांना योग्य पाठबळ आणि प्रशिक्षणही या विभागातफे दिले जाईल. यावेळी जिल्हा जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक विश्वास वेताळ जिल्हा निर्यात प्रचलन समितीचे सदस्य व सांगली मिरज औद्योगिक वसाहतीच्या संघटनेचे पदाधिकारी जेष्ठ उद्योजक संजय अराणके कृष्णा व्हॅली औद्योगिक वसाहतीचे माजी अध्यक्ष रमेश आरवाडे,इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट्स प्रमोशन कौन्सिल चे सी एच नाडियार, उद्योजक योगेश राजहंस, कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे बी एम बामणे, परकीय व्यापार महासंचालनालयाचे सिद्धांत गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post