जळगाव जिल्ह्यातील यावल तालुका प्रतिनिधी फिरोज तडवीमहाराष्ट्रात सतत होत असलेल्या महापुरुषांच्या विटंबना यांना अनुसरून, आपल्या नायगांव गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मुख्य चौक आहे,
तसेच गावातील सर्व मंदिर, मस्जिद, सार्वजानिक स्थळे असून या ठिकाणीं अनुचित प्रकार घडत असून गावाची सुशांतता धोक्यात येत असल्याच्या घटना वारंवार घडत असून याला आळा बसावा म्हणून नायगांव गावातील भीम.
आर्मी संघटनेच्या वतीने तसेच महापुरुषांचे फलक या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न म्हणूनव कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही हि बाब लक्षात घेऊन नायगांव ग्रामपंचायत कडून सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावे हि समस्त समाज बांधवांकडून निवेदन देण्यात आले यावेळी,
निवेदनात म्हटले आहे की पंधरा दिवसांत सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात न आल्यास गावात काही अनुचित प्रकार घडल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील निवेदन देताना भिम आर्मी चे, भिमराव सावळे, विशाल भालेराव, विकास सावळे,किरण सावळे, अक्षय सपकाळे, नितीन सावळे, मनोज तायडे,राज सावळे,दिपक सावळे, प्रविण सावळे आदि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते
Discussion about this post