मागच्या प्लॅट वाल्यानी तोडले अशी चर्चा
महामार्ग प्रशासन कुंभकरणी झोपेत
प्रशासना कडून अजून परेंत कुठलीच कार्यवाही नाही
सावनेर प्रतिनिधी – सूर्यकांत तळखंडे
सावनेर वरून छिदवाडा कडे जाणाऱ्या महामार्ग वरील बस स्टॉप अज्ञात लोकांनी तोडले यात चर्चा अशी पण आहे की बस स्टॉप मागील प्लॅट ज्या व्यक्तीचे आहे त्यांनीच तोडले परंतु त्यांनी कुठलीच परवानगी नाही घेतल्याचे पण चित्र समोर आहे प्लॅट मालिकांनी आपली जागा वाढावी म्हणून हेतूपरस्पर बस स्टॉप तोडल्याचे दिसत आहे.
परंतु या प्रकरणा मध्ये महामार्ग प्रशासन मात्र टाळाटाळीचे उत्तर देत आहे महामार्ग प्रशासन आम्हाला काहीच माहिती नाही म्हणून दर्शवीत आहे पण यात जिम्मेदार कोण प्रवासी निवारा प्रवास्यांना उन्हाळा,पावसाळा,हिवाळा या ऋतुमधून वाचविण्या करता व बस येई परेंत बसून राहण्याची उत्तम वेवस्था असते पण आत्ता प्रवास्यांचा हा हक्क हिष्कावून घेतल्याचा हा प्रकार आहे महामार्ग प्रसाशन पण या बाबतीत कुंभकर्णी झोपेत दिसत आहे.
Discussion about this post