जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारगाव बडगे येथील मुख्याध्यापक श्री मिलिंद कटकमवार यांना शाळा व्यवस्थापन समिती चारगाव बडगे यांच्या कडून सेवानिवृत्ती पर भावपूर्ण निरोप देण्यात आला. सरांनी सलग 13 वर्ष या गावात सेवा केली. त्यामूळे त्यांचे गावाशी एक प्रकारचे ऋणानूबंध जुळले आहेत.
कार्यक्रमाला सिंदेवाही तहसील कार्यालयाचे तहसीलदार मा.श्री.पानमंद साहेब यांची बहुमूल्य अशी उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांना साहेबांचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाला गावाचे सरपंच सौ अस्मिताताई कवठे,शा. व्य.समितीचे अध्यक्षा प्रियंका मडावी सर्व सदस्य आणि तंटामुक्ती अध्यक्ष श्री हर्षानंद गजभिये, श्री रामदास कवठे माजी तंटामुक्ती अध्यक्ष तसेच समस्त पालकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोरेश्र्वर गौरकर सर डोंगरगाव आणि प्रास्ताविक कु.अश्विनी साटोटे मॅडम तर आभारप्रदर्शन सौ मनीषा गिरकडर मॅडम यांनी केले.
Discussion about this post