
मेहकर तालुका प्रतिनीधी, सुबोध आखाडे..
डोणगाव. दि. 18/12/2024 रोजी गुप्त माहितिचा आधारे घाटबोरी वन परिक्षत्रतील वन कर्मचारी रात्र गस्ती वर असताना रात्री 10-11 च्या सुमारास 5-6 लोक घाटबोरी वन परिक्षत्रा अंतर्गत येणाऱ्या बीट घाटबोरी मधील राखीव वन कक्ष क्रमांक 178 मध्ये अवैध रित्या प्रवेश करून सागवान जातीचा मौल्यवान वृक्षाची तोड करताना आढळून आले. सादर लोकांना पकडण्यास गेले असता त्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पण एका आरोपीला पकडण्यात वन विभागाला यश आले.
सोबतच सागवान लाकडाचे 5 नग जप्त करण्यत आला. पुढील तपासामध्ये आरोपी ह्याने त्याचा साथीदाराची नावे सागितले असता आरोपी संदेश अंभोरे ,अजय चकेवार ,संजय राठोड ,प्रमोद रांम्हाळे ,संदीप गोटे , किशोर अंभोरे .आरोपी यांना अटक करून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मेहकर ह्याचा समोर हजर करण्यात आले असता मा. न्यायल्याने एक दिवसाची वन कोठडी सुनावली सदर कारवाही सरोज गवस उप वनसंरक्षक बुलढाणा वैभव काकडे सहायक वनसंरक्षक मेहकर अंकुश येवले वनपरीक्षेत्र अधिकारी ह्याचा मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हया कारवाही मध्ये घाटबोरी वन परीक्षेत्रातील कर्मचारी सहभागी असून पुढील तपास वनपाल उषा जाधव करीत आहेत..
Discussion about this post