खेळाडूंनी लॅक्रॉस खेळा कडे करीअर म्हणून पाहावे डॉ.बाबर
सेलू (. )महाराष्ट्र राज्य लॅक्रास असोसिएशन व परभणी जिल्हा असोशियन व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने १ ली राज्य लॅक्रॉस सब ज्युनिअर व ज्युनिअर क्रीडा स्पर्धा 2024-25.दि ते 21 डिसेंबर 2024 .स्पर्धा उद्घाटन: स.११ वा.श्री हनुमान गड नूतन विद्यालय क्रीडांगण सेलू येथे उद्घाटन डॉ.व्हि.के. कोठेकर (सचिव, नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष:- डॉ.एस.एम.लोया (अध्यक्ष नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू) प्रमुख पाहुण्या डॉ. सुमेधा ठाकुर (अध्यक्ष: महाराष्ट्र लॅक्रॉस असोसिएशन)
डॉ. मोहम्मद बाबर (राज्य सचिव महाराष्ट्र लेक्रास असोसिएशन) संतोष पाटील (मुख्याध्यापक ) किरण देशपांडे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास माने, ज्ञानेश्वर गिरी, गणेश माळवे, जिल्हा सचिव प्रशांत नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते
राज्य सरचिटणीस डॉ बाबर म्हणाले लॅक्रॉस खेळ फार पूर्वीपासून खेळ खेळला जातो, महाराष्ट्र राज्यातील प्रथमच सेलू येथे आयोजित करण्यात आली आहे. लॅक्रॉस खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो, 2028 साली ऑलिंपिक स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला आहे. या खेळात भविष्य सेलू शहरातील खेळाडू ऑलिंपिक स्पर्धेत खेळतील अशी अपेक्षा व्यक्त केली. खेळाडूंनी खेळास मनोरंजन म्हणून न पाहता करीअर म्हणून पाहावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ आम्ले, तर आभारप्रदर्शन गणेश माळवे यांनी मानले.
स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील 22 जिल्हा सहभागी झाले आहेत.
पहिला सामना परभणी वि. नाशिक दरम्यान परभणी संघाने 2 गोल ने विजयी ठरला. दुसरा सामना बुलढाणा वि सोलापूर दरम्यान बुलढाणा 1 गोलने विजयी ठरला.तिसरा सामना अतितटी सामन्यात अमरावती वि नागपूर दरम्यान बरोबरीत सुटला. विजेता संघातील खेळाडूंना सामनावीर पुरस्कारात हेडफोन व स्मार्ट वॉच राज्य संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा अध्यक्ष संतोष कंटाळे ( परभणी जिल्हा लॅक्रॉस असोसिएशन) , यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांगडे, अनुराग अंबटी, कुणाला चव्हाण, सुरज शिंदे, महेश काळदाते, अमोल बिचाले, समाधान मस्के, गणेश सावटे,
Discussion about this post