
संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित 14 झेप साहित्य संमेलन डॉ बी जी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रा.डॉ.भरतसिंग सलामपुरे यांची जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दगडूजीराव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाळूज बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथे दहा ते पंधरा वर्षापासून प्रा.डॉ.भरतसिंग सलामपुरे यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वोत्तम पदी व उत्कृष्ट विद्यापीठांमधून अनेक पदवी मिळवले आहेत. बी. पी.एड. डबल. म्हणजे दोन वेळा पीएचडी मिळवली आहे.अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचे नाव मोठे केले आहेत. पोलीस भरती असेल किंवा एमपीएससी यूपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थी पदावर रुजू केली आहेत. पोलीस भरतीमध्ये होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन विद्यार्थी घडवत आहे. या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप कमी वेळात आपले नाव उंचावले आहेत. यांचं या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार आणि सन्मानित करणार आहे. व तिसगाव मधील ते पहिलेच प्राध्यापक आहेत ज्यांची शारीरिक शिक्षण विषयामध्ये दोन वेळा पीएचडी मिळवली आहे .या पुरस्काराबद्दल अनेक दिग्गजनी आणि त्यांचे अभिनंदन केले आहेत. माजी सरपंच श्री मिठठूलाल तारय्यवाले दगडूजी देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राहुल हजारे,उपप्राचार्य डॉ. संजय सांभाळकर,प्रो.डॉ. दिलीप अर्जुने, (अध्यक्ष शैक्षणिक महासंघ डॉ.बा.म.आ.विद्यापीठ संभाजीनगर) प्राचार्य डॉ.रमेश जायभाय,श्री मोहनसिंग सलामपूरे,दीपक भेरे,लालचंद सूर्यवंशी,मोहन गीते,अण्णासाहेब लफड,प्रा.सुनील गायसमुद्रे,डॉ. शेखर कोठुळे आदींनी अभिनंदन केले आहे..
Discussion about this post