सुरगाणा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिन साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी : राजेंद्र टोपले
सुरगाणा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीमध्ये विविध पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करून पेसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तालुकास्तरावर पंचायत समिती सुरगाणा कार्यालय येथे वांगण सु. येथून आलेल्या आदिवासी कलापथकाने आदिवासी पारंपारिक डोंगर मावलीचे नृत्य पावरी व ढोल यांच्या तालावर नृत्य करत कार्यक्रम सादर करण्यात आला.
पेसा दिनानिमित्त ग्रामस्तरावर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
Discussion about this post