
नायगाव तालुका प्रतिनिधी…
दिपक गजभारे घुंगराळेकर…
नायगाव:- गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल निंदनीय वक्तव्य करून करोडो आंबेडकर अनुयायांच्या भावना चकनाचूर केल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नायगावचे केला आहे. या प्रकरणी महासभेने आज दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी महामहीम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना नायगाव तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर केले.
निवेदनाद्वारे गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत तत्काळ माफी मागावी आणि त्यांना पदावरून हटवावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान राखण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे…
निवेदनावर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष अनिल गायकांबळे रोहित पांडुरंग गायकवाड. शशिकांत सोनसळे, राहुल भेदे.भीमराव पवार संजय गायकवाड अमृता पवार मिलिंद काकडे गोविंद हनुमंते रणजीत गायकवाड मधुकर जोंधळे संदेश गायकवाड वं.ब.आ.ता.उपाध्यक्ष, सतीश वाघमारे वं.ब.यु.आ.नांदेड, जिल्हा सहसचिव, बाळासाहेब सोनकांबळे, गौतम जोंधळे आदींसह अनेक अनुयायांच्या स्वाक्षऱ्या आहेत…
Discussion about this post