

(राम विलास आडे या तरुणाचा उपक्रम 200 रुग्णांना मदत )
✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
पुसद :- रक्तदान हेच श्रेष्ठदान असे म्हणले जाते आहे हे साक्षात खरे असून आजच्या या काळात रक्त दानापेक्षा मोठे कुठलेच दान नाही. आपण दररोजच्या जीवनात पाहत आहे कुठल्यान कुठल्या दवाखान्या मध्ये दररोज कुठल्याही रुग्णांला रक्ताची आवश्यकता लागतच असते परंतू काही वेळा वेळेवर रक्त मिळत नाही. एखाद्या रुग्णांला आपला जिव गमवावा लागतो अशा वेळी रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ खुप जास्त होते. अशी धावपळ होवू नये व रुग्णांना वेळेतच रक्त उपलब्ध व्हावे यासाठी स्व वसंतराव नाईक रक्तदाता ग्रुप या नावाने एक व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करण्यात आला.
शहरामध्ये एक चळवळ म्हणून व सामाजिक कार्य म्हणून या ग्रुपचे वैशिष्ट आहे. रुग्णांना वेळेवर रक्त मिळवून देणे ही या ग्रुप ची उदिष्टे आहे. या ग्रुपची स्थापना 15 l 02 । 2024 रोजी झाली असून ग्रुपचे कारभार संचालक राम वि आडे हे पाहतात. रक्तदात्याचे पण खुप खुप आभार मानून त्यांना धन्यवाद देतात. तसेच युवा पिढीला पण सल्ला देतात की गरजवंत रुग्णांना रक्तदान करण्यासाठी न घाबरता रक्तदान करायला पुढाकार घेयायला पाहिजे. अशी अपेक्षा ग्रुप चे संचालक राम आडे यांनी केली आहे.
आज पर्यंत या ग्रुप च्या माध्यमातून जवळपास 200 गरजवंत रुग्णांना रक्त पुरविण्यात आले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून पुसद या शहरामध्ये च नव्हे तर यवतमाळ अमरावती बुलढाणा नाशिक अहमदनगर नांदेड आणि मुंबई या सारख्या मोठ्या शहरांमध्ये पण काही प्रमाणात रक्त पुरविण्याचे काम केले आहे. आणि या पुढे पण अशाल प्रकार चे काम करित राहू या ग्रुपच्या माध्यमातून अशी माहिती यावेळी राम विलास आडे यांनी दिली..
Discussion about this post