
✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
📍तहसील कार्यालय,भामरागड
दि. 24 डिसेंबर रोजी मा.आ.डॉ.राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी तहसील कार्यालय भामरागड येथे भेट देऊन तहसील कार्यालयात सुरु असलेल्या कामकाजा विषयी माहिती घेतली व तहसील कार्यालयात कामकाजाकरिता आलेल्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना त्या समस्या लवकरात-लवकर सोडविण्याचे आदेश दिले.यावेळी तहसीलदार किशोर बागडे,आदिवासी सेवक डॉ.चरणजित सिंग सलुजा, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, तालुकाध्यक्ष रमेश मारगोनवार, तसेच अन्य पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..
Discussion about this post