
मुकुटबन :
बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड (युनिट आर.सी.सी.पी.एल, मुकुटबन), शासकीय आरोग्य यंत्रणा आणि आम्ही आमच्या आरोग्यासाठी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र, मुकुटबन येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार श्री. संजय निळकंठराव देरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.सी.सी.पी.एल युनिट हेड मा. श्री. जयंत कंडपाल सर होते. यावेळी एच.आर. हेड मा. श्री. बिजमोहन वर्मा, तसेच आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संयोजक डॉ. गोगुलवार यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रमुख पाहुण्यांमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर साहेब, वैद्यकीय अधिकारी डॉ. वानखडे, आर.सी.सी.पी.एल चे सी.एस.आर अधिकारी श्री. विजय कांबळे श्री. धर्मेंद्र पात्रा, श्री. संदीप उरकुडे तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार श्री. संजय निळकंठराव देरकर यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर आमदार देरकर साहेब, अध्यक्ष श्री. जयंत कंडपाल सर आणि प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करत आरोग्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली.
आरोग्य शिबिरात एकूण ३४७ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच गरजेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.
सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पेंदाने यांनी केले, तर आभार प्रदर्शन नंदा उलमाले यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य ताई प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. ज्ञानेश्वर घाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे कमर्चारी विनूगोपाल येनपोतुलवार,शिवम लिल्हारे, सपना ताई, विजयाताई, सुधाताई, मंदोदरीताई, गीताताई, रंजनाताई, मिनाताई, माधुरीताई, संध्याताई, प्रियाताई, आम्रपालीताई, याशिवाय नीड संस्थेचे प्रकल्प समन्वयक कमलाकर सुरवसे, भावना ताई, प्रदीप घोडम, राज विवेकानंद, अरुणोदय व महिला कर्मचारी यांच्या मोलाच्या योगदानामुळे कार्यक्रम यशस्वी झाला..
Discussion about this post