गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड:-परभणी येथील वडार समाजाचा युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमध्ये असताना अमानुषपणे मारहाणीदरम्यान झालेल्या मृत्यूची सीबीआय चौकशी करून त्याच्या परिवारास शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या वतीने उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी यांना दिले. त्यामध्ये परभणी येथील वडार समाजाचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी जो वकिलीचे शिक्षण घेत होता. त्याच्यावर परभणी येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने झालेल्या कारवाईत न्यायालयीन पोलीस कोठडीमध्ये अमानुषपणे मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. वकिलीचे शिक्षण घेत असलेला वडार समाजाचा विद्यार्थी ज्याचा परभणी येथे झालेला दगडफेकीशी काहीही संबंध नसताना त्याच्यावर अशी कारवाई होणे व त्याचा मृत्यू होणे ही समाजासाठी अत्यंत दुःखदायी घटना आहे. त्याचा मृत्यू संशयास्पद आहे.या कारणाने घटनेची सीबीआय चौकशी व्हावी व या गरीब विद्यार्थ्यांच्या परिवारास शासकीय मदत मिळावी, अशी मागणीकरिता झालेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदवीत असल्याचे निवेदनात नमूद आहे. ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे तालुकाध्यक्ष पवन मेंढे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी निवेदन सादर केले. यावेळी रमेश मेंढे, सुभाष बाभुळकर, अंकुश बाभुळकर, शंकर पवार, अनिल मेंढे, पप्पू जाधव, मसू जाधव, सुधाकर मेंढे, विशाल धोत्रे व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
परभणीमधील पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकाराची सखोल न्यायालयीन चौकशी व्हावी. ही चौकशी सीटिंग न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावेत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावं.
तालुकाध्यक्ष-: पवन मेंढे वडार समाज संघटना,
Discussion about this post