आज दि. २३/१२/२४ संसदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी मां.पंतप्रधान महोदय यांना मा.तहसीलदार चांदूरबाजार यांच्या मार्फत करण्यात आली.
17 डिसेंबर 2024 रोजी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींचा संसदेत अवमान केला.त्यामुळे देशातील संपूर्ण बहुजन समाज दुखावला गेला आहे.घटनात्मक पदावर असलेल्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा आम्ही सर्वजण तीव्र शब्दात निषेध करतो आणि देशाच्या पंतप्रधानांना विनंती करतो की समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या गृहमंत्र्यांची त्यांच्या पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी.
जेणेकरून बहुजन समाजात रोष निर्माण होणार नाही.तसेच परभणी मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची व संविधानाच्या प्रतीकृतिची तोडफोड करणार्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी आणि निर्दोष आंबेडकरी अनुयायांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे.तसेच अचलपूर येथील बुंदेलपूरा मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना करण्याच्या उद्देशाने दगड आणि राखळ फेकणाऱ्या आपोरींना कठोर शिक्षा देण्यात यावी.या वरील सर्व प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जावी आणि याच्यापुढे कोणीही भारतीय संविधान आणि संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात बोलू नये.आणि कोणीही महापुरुषांचा अपमान करु नये.अशे झाल्यास वंचित रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.
असे निवेदनातून सांगण्यात आले.निवेदन देते वेळी.सुरज चव्हाण (तालुकाध्यक्ष चांदूरबाजार) वं.ब.यु.आ.तोषल नव्हाळे (ता.महासचिव)आकाश उके (ता. उपाध्यक्ष)सुधीर तायडे (ता.उपाध्यक्ष)श्रीकृष्ण तंतरपाळे,हरिदास इंगळे,अंकूश पाटील, प्रताप गवई,आकाश वानखडे,किरण वानखडे,अविनाश वासनिक,शिवम आठवले,अंकूश गव्हांदे,भारत तायडे,अब्दुल रखिम,पंडितराव पहाळण,रूपराव बोरकर,रघुनाथ नेव्हारे,रामेश्र्वर राउत,प्रशांत गवई,दीपक गवई,सागर मोहेकर,अमोल दामले,अनिल तेलमोरे,मोहनदास पळसपगार,सिद्धार्थ भोरगळे,आकाश आठवले, संजय तागडे,नरेश नाईक,पप्पू तायडे,गौरव भोवते,सुरेखा गायकवाड,योगेश तांहोलकर (भारतीय बौद्ध महासभा)अमरदिप गवई (समता सैनिक दल प्रमुख)तालुका पदाधिकारीवंचित बहुजन आघाडी,भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी अणुयायी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post