मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत सर्व आस्थापना येथे काम करणारे सर्व कर्मचारी यांच्या कामाचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा.. हा कालावधी सहाच्या ऐवजी 11 महिन्याचा करण्यात यावा. यासाठी तालुक्यातील सर्व प्रशिक्षणार्थी पंचायात समिती कार्यालय उमरखेड येथे एकत्र आले. सर्वांनी मिळून एक बैठक घेवून विविध विषयावर चर्चा करण्यात आली.आणि प्रशिक्षणार्थी यांचा कालावधी वाढवण्यासाठी गटविकास अधिकारी साहेब व गट शिक्षणाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Discussion about this post