थोर मराठी साहित्यिकांपैकी एक थोर नाव म्हणजे ‘पांडुरंग सदाशिव साने’ अर्थात साने गुरुजी त्यांच आपल्या मातृभूमीवर प्रेम होतच, पण आपल्या जन्मदात्या आईवरही प्रचंड प्रेम होतं.
आजही त्यांचे शामची आई हे पुस्तक वाचताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.त्यांनी प्रचंड लेखन केले व संपुर्ण लेखन हे समाजोद्धारासाठी लिहिले.
या व्यतिरिक्त ते एक आदर्श शिक्षक होते. चळवळ स्वातंत्र्य लढा आणि समाज सुधारण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं. स्वातंत्र्यासाठी अनेकदा तुरुंगवासही भोगला.पण असं असतानाही आपला लढा सुरूच ठेवला.
गुरुजींनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले. ज्याचा समाजाला आणि पर्यायाने देशाला नक्कीच फायदा झाला.अशा थोर व्यक्तीमत्त्वाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!
Discussion about this post