कळवण प्रतिनिधी-रमेश गवळी
नाशिक| मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूल नाशिक शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत इयत्ता नववीची सहल कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन, ज्योतिबा, पन्हाळा किल्ला, कन्हेरी मठ, शाहू पॅलेस, प्रतापगड,प्रतिबालाजी या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली.मविप्र संस्थेच्या,शालेय समिती,माता पालक शिक्षक संघ यांच्या पुर्वपरवानगीने मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहल आनंददायी आणि अविस्मरणीय राहिली. एकूण तीन बस घेऊन सर्वप्रथम प्रति बालाजी या ठिकाणी बालाजींचे दर्शन करून प्रतापगड या ठिकाणी पोहोचल्यानंतर संपूर्ण पाहणी करून त्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. रात्रीच्या वेळेस ज्योतिबा या ठिकाणी पोहोचल्यानंतर सकाळी ज्योतिबांच्या दर्शन घेऊन पन्हाळा किल्ला संपूर्ण माहिती मिळवली.त्यानंतर कोल्हापूरचे असलेले वैभव म्हणजे शाहू पॅलेस या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शाहू महाराजांची असलेली कारकीर्द त्यांनी वापरलेले साहित्य किंवा वस्तू,वास्तु याबाबत सविस्तर माहिती मिळवून घेतली.त्यानंतर श्री सिद्धगिरी संस्थान मठाला भेट त्या ठिकाणी दिव्या गार्डन, माया महल ,तारांगण, म्युझियम ग्राम संस्कृती विद्यार्थ्यांनी दिव्या गार्डनमध्ये असलेले निसर्गरम्य वातावरण त्यानंतर तारांगण मध्ये पृथ्वी व असलेले ग्रह याबद्दल माहिती करून घेतली. त्यानंतर म्युझियम मध्ये ग्राम जीवन व संस्कृतीमध्ये साकारलेले अनेक प्रतिकृतीच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती काय होती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस महालक्ष्मीचे दर्शन घेऊन सहलीचे शेवट करण्यात आला अशा पद्धतीने ही सहल नियोजनबद्ध विद्यार्थ्यांना खूपच आनंददायी व अविस्मरणीय राहिली.सहल यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक यांचे सहकार्य लाभले.
Discussion about this post