====≠==============
तालुका प्रतिनिधी कमलेश पाटील
रावेर – रावेर तालुक्यातील वाघोड गावातील जितेंद्र जगन्नाथ बावस्कर वय 56 ह्या व्यक्ती चा दिनांक 26 रोजी पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटक्या आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
वाघोड येथील रहिवासी तथा आजुबाजूच्या गावात आठवडे बाजारात मध्ये भाजी पाला विक्रेते जितेंद्र जगन्नाथ बावस्कर ह्या व्यक्ती चा दिनांक 26 च्या सकाळी झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आल्याचे घरातील मंडळी च्या लक्षात येताच त्यांनी त्वरित च रावेर येथील हद्यरोग तज्ञ डॉ योगेश पाटील यांच्या दवाखान्यात नेले असता डॉ योगेश पाटील यांनी मृत घोषित केले, हात मजूरीवर संसाराचा गाढा चालवत असतांना अचानक घरातील कर्त्या व्यक्ती जाण्याने कुटुंब उघड्यावर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ,त्याचा पश्चात पत्नी , दोन मुली आणि दोन मुले आहेत.
Discussion about this post