
रावेर प्रतिनिधी न्यूज । २७ डिसेंबर २०२४ । एकीकडे शेतात पिकविलेल्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असतांना
च आता नवीन वर्षाच्या आगमनासोबत शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक चिंताजनक बातमी आहे. ती म्हणजे १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या (chemical fertilizers) दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
या खतांच्या किमतीत वाढ?
डीएपी – DSP (डाय-अमोनियम फॉस्फेट), टीएसपी-TSP (ट्रिपल सुपर फॉस्फेट), १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमतीत वाढ होणार आहे. आधीच खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई करणे शेतकऱ्यांसाठी एक आव्हान बनले असताना, त्यातच रासायनिक खतांच्या किमतीतील वाढ शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी आहे..
Discussion about this post