
आज महिला व बाल विकास जिल्हा परिषद अंतर्गत महिला व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण ब्युटी पार्लर मोफत प्रशिक्षण वणी येथील अंगणवाडी केंद्रात चालू करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत इंफोकार्म कॅम्पुटर इन्स्टिट्यूट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व बाल विकास प्रकल्प अधिकारी दिंडोरी यांच्या प्रयत्नाने महिला व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत ब्युटी पार्लर प्रशिक्षण मोफत देण्याचा कार्यक्रम वणी येथील 11राजवाडा अंगणवाडी केंद्रात सुरू केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. उज्वला धूम व अनिता बागुल अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. प्रतिभा वाळके व सुनिता पाचपांडे,व अंगणवाडी सेविका,सौ नंदाताई गांगुर्डे, अरूणा दुसाने, हुसैना शेख, सुनिता सोनवणे व प्रशिक्षक सौ शितल पाचपेडं व प्रशिक्षणार्थी मुली व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
सौ. प्रतिभा वाळके.. या योजनेचा जास्तीत जास्त संख्येने मुलींनी व महिलांनी याचा लाभ घ्यावा
सौ.. सुनिता पाच पांडे आपल्या अंगणवाडी सुरू होणाऱ्या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण व अजुन यासारख्या अनेक प्रशिक्षण मोफत योजना याचा लाभ आपल्या महिलांनी मुलींनी जास्तीत जास्त घ्यावा व त्या प्रशिक्षणाला जास्त जास्त सहभागी व्हावे .
जय मल्हार न्यूज टीव्ही सुरेश सुराशे प्रतिनिधी नाशिक..
Discussion about this post