————-‘——————–
हिमायतनगर(लक्ष्मण शेन्नेवाडी)हिमायतनगर दक्षीण भारतात एकमेव उभी मुर्ती असलेल्या मराठवाडा विदर्भ, तेलंगणा,कर्नाटकातील भावीकाचे जाज्वल्य देवस्थान हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मुर्तीच्या अवती भोवती कमानीला जवळपास 48 किलो चांदीची मुलामा लावण्यात आली.
श्रीच्या डोक्यावर झुबंर असलेली छत्री उभारल्या नंतर सुरक्षितेसाठी आकर्षीत असा काच बसविण्यात येणार असल्याचे मंदीर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रिश्रीमाळ यांनी सांगितले.
काही दिवसापुर्वीच देवस्थानाकडुन 50 सीसीटिव्ही कॅमेरे मंदीर परिसरात भाविक भक्ताच्या सुरक्षिततेसाठी बसविण्यात आले होते.जाज्वल्य देवस्थान श्रि परमेश्वर मंदीर दर्शनासाठी दुरवरून भावीक भक्त गर्दी करत असतात यात विशेषता आंध्रप्रदेश,विदर्भ मराठवाडा,कर्नाटक राज्यातुन हाजारोच्या संख्येने भाविक भक्त येतात भाविक भक्ताच्या व मंदीर ट्रस्ट कमेटीच्या सहकार्यातुन श्री परमेश्रवर मुर्तीच्या कमानीला मुलामा बसविण्यात आला असल्याने सर्व परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
Discussion about this post