कळवण प्रतिनिधी-रमेश गवळी
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल जायखेडा ता बागलाण विद्यालयात २६ डिसेंबर २०२४ रोजी शालेय विज्ञान प्रदर्शन साजरा करण्यात आला.
सुत्रसंचलन जेष्ठ विज्ञान शिक्षक श्री. शेवाळे एस आर सर यांनी केले.
प्रास्ताविक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री मोरे ए टी सर यांनी विज्ञान प्रदर्शन भरविण्यासाठीचा उद्देश व हेतु याविषयी माहिती दिली.
अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री. सोमनाथ दादा ब्राम्हणकार होते.
प्रमुख पाहुणे शालेय विज्ञान प्रदर्शनाला मा. श्री. जयंत ठाकरे सर (रयत शिक्षण संस्था) उपशिक्षक हे लाभले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे 💐💐👏👏पूजन करण्यात आले.
या दिनानिमित्त विद्यालयात पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात आले.
१. वैज्ञानिक उपकरणांची💡 🦿🦾🚀🛩🎥💡 मांडणी करण्यात आली.
२. वैज्ञानिक रांगोळी – वैज्ञानिक, शास्त्रज्ञ ,🫀 🫁 🧠 मानवी अवयव, यांच्या प्रतिकृतींचे रेखाटन करण्यात आले होते.
शिक्षक मनोगत श्री. साठे सर यांनी केले.
माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री अनिल दादा बोरसे, उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री बोरसे बाबाजी, श्री. संजय मोरे उपसरपंच, श्री नथु शेवाळे, श्री संतोष बापू अहिरे, श्री. मच्छिंद्र भाऊ खैरनार, श्री. निलेश पाटील सर, डॉ कपिल अहिरे उपस्थित होते.
मा. मुख्याध्यापक श्री मोरे सर व पर्यवेक्षक श्री ठाकरे सर यांनी सर्व विज्ञान विषय शिक्षकांना उपक्रमांचे वाटप व नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रदर्शन साठी विज्ञान शिक्षक श्री साठे सर, भोये सर, आहेर सर , शेवाळे सर, चौधरी सर, बागुल सर, पगार सर,लॅब असिस्टंट श्री संजय कापडणीस यांनी विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रतिकृती सादर करण्यासाठी मार्गदर्शन केले. रांगोळी रेखाटन करण्यासाठी श्रीमती बिरारी मॅडम देवरे मॅडम यांनी सहकार्य केले. अन्य गावित सर,श्री जाधव सर, श्री. वाघमारे सर, गायकवाड सर, शेवाळे सर, म्हसदे सर, गरूड सर,पवार सर, परदेशी मॅडम, क्षिरसाठ मॅडम, नेरकर मॅडम शिक्षकांनी कार्यक्रम व उपक्रमात यशस्वीतेसाठी सहभाग घेतला. फलखरेखाटन चित्रकला शिक्षक श्री देशमुख सर यांनी केले. आभार श्री आहेर सर यांनी मानले.
Discussion about this post