



सलाईन :
श्री. बळीराजा क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन
सोनपेठ (ता प्र) श्री बळीराजा क्रिडा महोत्सवात ग्रामीण भागात लोप पावत चाललेल्या विविध पारंपरिक खेळ खेळवले जात आहेत. मात्र त्या पारंपरिक खेळांना राजाश्रय दर्जा नाही.येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडुन न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश विटेकर तालुक्यातील वडगाव (सुक्रे) येथील संत मोतीराम विद्यालयात ग्रामीण क्रिडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक राष्ट्रीय रत्न भाई लक्ष्मणराव गोरेगावकर हे होते.उध्दघाटक आमदार राजेश विटेकर प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी आशाताई गरुड, शिक्षणाधिकारी संजय ससाणे, संस्थाध्यक्ष भाई तुषार गोरेगावकर, उपाध्यक्ष योगेश गोरेगावकर, माजी जिल्हा महिला व बालकल्याण सभापती श्रीमती चित्राताई गोरेगावकर, दिलिपराव दुधाटे, प्रशासकीय अधिकारी गिरीश सोळंके, बालासाहेब भोसले, सुभाष सुक्रे,दिपक बिडगर, सोपान सुक्रे, सरपंच अश्विनी भोसले, उपसरपंच बाबाराव कोपनर, परमेश्वर सूक्रे, नितीन गवळी,
आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना विटेकर म्हणाले की, श्री बळीराजा शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या बळीराजा क्रिडा महोत्सव हा नविन पिढीला प्रेरणा देणारा आहे. बळीराजा क्रिडा महोत्सवात पारंपरिक खेळ खेळवले जातात.परंतु त्या पारंपरिक खेळांना दर्जा नाही.मी नानांना अश्वाशित करू इच्छितो की, येणाऱ्या अधिवेशनात ग्रामीण भागात लोप पावत चाललेल्या व पारंपरिक खेळांना दर्जा मिळाला पाहिजे यासाठी सर्व बाबी मांडण्यात येईल जास्तीत जास्त खेळांना दर्जा प्राप्त करून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील असे शेवटी मत आमदार राजेश विटेकर यांनी केले आहे. श्री बळीराजा क्रिडा महोत्सवात संस्थेच्या २५ प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, वरिष्ठ महाविद्यालय आयुर्वेदिक महाविद्यालय आदी सर्व शाळांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमात भाई लक्ष्मणराव गोळेगावकर,शिक्षणाधिकारी गरुड, शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोविंद गाडे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम सुक्रे यांनी केले तर आभारप्रदर्शन शंकर शिंगणे यांनी मानले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बळीराजा शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे..




Discussion about this post